सोलापूर
ब्रेकिंग! सोलापुरात धक्कादायक प्रकार
- सोलापुरात एका खासगी बँकेतील वसुली कर्मचाऱ्यांनी माणुसकीला काळिमा फासेल, असे कृत्य केले आहे. चारचाकी वाहनाचे हफ्त चुकवले म्हणून वाहनासह कर्जदाराच्या मुलालाही उचलून नेल्याची धक्कादायक घटना जेलरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. याप्रकरणी, पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू आहे.
- पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक फेब्रुवारी रोजी शहरातील जेलरोड पोलीस ठाण्यात एका तरुणाचे अपहरण झाल्याची तक्रार झाल्यानंतर पोलिसांनी याबाबत तपास केला. त्यानुसार, येथील बँक कर्मचार्यांनी चार चाकी वाहनाचे हप्ते भरले नसल्याने कर्जदाराच्या मुलाचे चक्क अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे चारचाकी वाहनासह कर्जदाराच्या मुलाचेही अपहरण करण्यात आले होते. सोलापुरात या खासगी बँकेच्या वसुली कर्मचाऱ्यांकडून मोठी मुजोरी करण्यात आल्याचे पोलीस तपासातून समोर आल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. या कर्मचाऱ्यांनी कर्जदाराच्या मुलाचे अपहरण करत त्यास एका गोडाऊनमध्ये डांबून ठेवले होते. याप्रकरणी वसुलीसाठी अपहरण करणाऱ्या शकील बोंडे, इमरान शेख, देवा जाधव या तिघांविरोधात जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील अधिक तपास सुरू आहे.
- वसुली कर्मचाऱ्यांनी कर्जदाराच्या मुलाचे अपहरण केले. मात्र, त्यानंतरही मुलाला सोडण्यासाठी दहा हजार रुपयांची खंडणी मागितल्याचेही पोलिसा तपासातून समोर आले आहे. त्यामुळे चुकीच्या पद्धतीने जबरदस्तीने वसुली करणाऱ्यांच्या विरोधात कठोर कारवाई करणार असल्याचा इशारा पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी दिला आहे.