क्राईम
माधुरी दीक्षितच्या ‘त्या’ गाण्यावर नवरदेवाचा डान्स

- लग्नात नाचणे नवरदेवाला चांगलेच महागात पडले आहे. ‘चोली के पिछे क्या है…’ या गाण्यावर नवरदेवाने केलेला डान्स त्याचे लग्न मोडण्यासाठी कारणीभूत ठरले. नवरदेवाचा डान्स पाहून नवरी मुलीचे वडील मुलावर प्रचंड चिडले आणि त्यांनी लग्नच मोडले. अनेकांनी त्यांना समजवण्याचा खूप प्रयत्न केला, मात्र ते ठाम राहिले.
- ही घटना नवी दिल्लीतील आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नवरदेवाच्या मित्रांनी त्याला डान्स करण्यास सांगितले होते. नवरदेव जेव्हा नाचण्यासाठी उभा राहिला तेव्हा प्रसिद्ध बॉलिवूड गाणे ‘चोली के पीचे क्या है’ वाजले. नवरदेवाने मित्रांसोबत या गाण्यावर नाचायला सुरुवात केली. वराला नाचताना पाहून अनेक पाहुण्यांनीही त्याला प्रोत्साहन दिले. मात्र नवरीच्या वडिलांना नवरदेवाचे हे कृत्य अजिबात आवडले नाही.
- मुलीच्या वडिलांनी नवरदेवाचे नाचणे योग्य नाही, म्हणून त्यांनी लगेच लग्न थांबवण्याची घोषणा केली. नवरीच्या वडिलांनी म्हटले की, नवरदेवाचे असे वागणे त्यांच्या कुटुंबाच्या मूल्यांचा अपमान करणारे आहे. वडिलांचे बोलणे ऐकून नवरी देखील रडू लागली. नवरीने वडिलांना समजावण्याचा प्रयत्न केला, पण ते ऐकण्याच्या परिस्थितीत नव्हते. मजा-मस्तीत हा सर्व डान्स सुरु होता, असे नवरीने रडत आपल्या वडिलांना सांगितले. मात्र त्याचा काहीही फायदा झाला नाही.



