महाराष्ट्र
ब्रेकिंग! महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेत मोठा राडा

-
अहिल्यानगरमध्ये महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेत मॅट विभागात पृथ्वीराज मोहोळ विजयी ठरला. माती विभागाच्या अंतिम लढतीत सोलापुरच्या महेंद्र गायकवाड याने साकेत यादवचा पराभव केला. त्यामुळे आता पृथ्वीराज मोहोळ विरुद्ध महेंद्र गायकवाड यांच्यात महाराष्ट्र केसरीसाठी लढत होणार आहे. गादी विभागात नांदेडचा शिवराज राक्षे विरुद्ध पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ यांच्यात अंतिम फेरीची लढत झाली. या लढतीत पृथ्वीराज मोहोळ शिवराज राक्षेचा पराभव केला. या लढतीदरम्यान राक्षे समर्थक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. आम्हाला अंतिम निर्णय मान्य नसल्याचा पवित्रा राक्षे समर्थकांनी घेतला. पंचाचा निर्णय चुकीचा असल्याचे राक्षे याने म्हटले. यावेळी संतप्त झालेल्या शिवराजने पंचाला लाथ मारल्याचे दिसून आले. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करीत वाद मिटवला.



