देश - विदेश
ब्रेकिंग! काँग्रेसला नवा दणका; या राज्यात ऑपरेशन लोटस?
- तेलंगणामध्ये काँग्रेस पक्षात अंतर्गत कलह सुरू असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. कारण, पक्षाच्या दहा आमदारांनी बंद दाराआड गुप्त बैठक घेतली, ज्यामुळे मुख्यमंत्री रेवंती रेड्डीसह कॉंग्रेसच्या नेतृत्वात चिंता निर्माण झाली आहे.
- पक्षाच्या आमदारांमधील वाढत्या असंतोषाला शांत करण्यासाठी मुख्यमंत्री रेवंत रेड्डी हे त्यांच्या सर्व मंत्र्यांसोबत कमांड कंट्रोल सेंटरमध्ये बैठक घेणार आहेत.
- असंतुष्ट आमदार मंत्री पोंगुलेटी श्रीनिवास रेड्डी यांच्यावर नाराज असल्याचे सांगितले जाते. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन, मंत्री पोंगुलेटी श्रीनिवास रेड्डी यांनी मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी पालैरला भेट रद्द केली.
- मुख्यमंत्री रेड्डी यांनी अधिकाऱ्यांना बैठकीला उपस्थित न राहण्याचे निर्देश दिले आहेत, यावरून पक्षातील मतभेदाचे गांभीर्य दिसून येते. स्थानिक स्वराज्य संस्था आणि एमएलसी निवडणुकीपूर्वी आमदारांनी केलेल्या कोणत्याही बंडामुळे जनतेत चुकीचा संदेश जाऊ शकतो, अशी भीती काँग्रेस हायकमांडला आहे.
- आमदार अनिरुद्ध रेड्डी यांच्या फार्महाऊसवर 10 काँग्रेस आमदारांची भेट झाली, ज्यामुळे पक्षातील अंतर्गत मतभेदांच्या अटकळी वाढल्या.
- बैठकीला उपस्थित असलेल्या आमदारांमध्ये नैनी राजेंद्र रेड्डी, भूपती रेड्डी, येनम श्रीनिवास रेड्डी, मुरली नाईक, कुचुकुल्ला राजेश रेड्डी, संजीव रेड्डी, अनिरुद्ध रेड्डी, लक्ष्मीकांत, दोंथी माधव रेड्डी आणि बिर्ला इलाय्या यांचा समावेश होता.