राजकीय
शरद पवार गटाला भगदाड पडणार

- विधानसभा निवडणुका झाल्यापासून शरद पवार गटात पडझड होण्याची शक्यता दिसत आहे. अजितदादा यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी याबाबतचे संकेतच दिले आहेत. चांद्यापासून बांद्यापर्यंत आता आमच्या पक्षात इनकमिंग सुरू झाल्याचेही तटकरे यांनी सांगितले. तसेच एक बडा नेताही आमच्या पक्षात येणार असल्याचे तटकरे यांनी स्पष्ट केले.
- तटकरे यांनी मीडियाशी संवाद साधताना हा दावा केला आहे. रामराजे नाईक निंबाळकर, संजीवराजे निंबाळकर हे मागे अजितदादांना भेटले होते. त्यांची दादांसोबत सखोल चर्चाही झाली. पण याबाबत निर्णय झाला नाही. या सर्वांनीच शरद पवार साहेबांसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. संजीवराजे निघून गेल्यावर सुद्धा त्यांच्या मतदारसंघात राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर आमचा विधानसभेचा उमदेवार विजयी झाला आहे, असे सांगतानाच संजीवराजे यांना पक्षात प्रवेश द्यायचा की नाही हे राज्यसभा सदस्य नितीन पाटील आणि जिल्ह्याचे पक्षाचे अध्यक्ष असतील यांच्याशी चर्चा करू आणि योग्य तो निर्णय घेऊ, असे तटकरे म्हणाले. तसेच आता इनकमिंग चांद्यापासून बांद्यापर्यंत जोरात आहे, असे सूचक विधानही त्यांनी केले.