महाराष्ट्र

जीबीएसबाबत दिलासादायक बातमी

  • पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून गुलियन बॅरी सिंड्रोम या आजाराच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. शहरात या आजाराचे 149 संशयित रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान ससून रुग्णालयातील पाच रुग्णांनी ‘जीबीएस’वर यशस्वी मात केली आहे. पुष्पगुच्छ देऊन त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.
  • यावेळी ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. एकनाथ पवार म्हणाले की, ससून रुग्णालयात जीबीएस आजाराचे 28 रुग्ण उपचार घेत आहेत. गेल्या पंधरा दिवसांपासून शहरात जीबीएसचे रुग्ण वाढत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मात्र, असे असले तरी या आजाराचे पाच रुग्ण बरे झाले आहेत. त्यांना काल डिस्चार्ज मिळाला. तर येत्या एक ते दोन दिवसात अजून दहा रुग्णांना डिस्चार्ज मिळणार आहे. त्यामुळे नागरिकांनी भीती बाळगू नये.
  • यावेळी डिस्चार्ज मिळालेल्यांपैकी एका रुग्णाने सांगितले की, मला 23 जानेवारी रोजी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. ससून रुग्णालयातील सर्व डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी विशेष काळजी घेतली. त्यामुळे मी लवकर बरा झालो.

Related Articles

Back to top button