-
संजय राऊत एका खासदारांच्या माध्यमातून काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याचा गौप्य्स्फोट मत्स्य विकास मंत्री नितेश राणे यांनी केला आहे. राऊत यांनी आपली लंगोट सांभाळावी नंतर दुसऱ्यांच्या घरात डोकवावे, असा टोलाही त्यांनी लगावला.
-
आदित्य ठाकरेमुळे उबाठामध्ये जी खदखद आहे, त्यावर राऊत यांनी सामनामध्ये लिहावे. उद्धव ठाकरे यांना स्वतःचा धर्म नाही, उद्धव यांचे राजकीय धर्मांतरण झाले आहे, अशी तिखट प्रतिक्रिया राणे यांनी दिली आहे.
-
दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात विसंवाद आहे. त्यामुळे सरकारकडे मोठे बहुमत असूनही राज्य अस्थिर आहे, असा दावा राऊत यांनी त्यांच्या रोखठोक सदरातून केला आहे.
संजय राऊत लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करणार
