सोलापूर
सुख-दुःखात साथ देणारा एक चांगला मित्र हरपला

चेतन नरोटे यांची प्रतिक्रिया, अनेक आठवणींना उजाळा दिला
सोलापूर महानगरपालिकेचे माजी महापौर माझे अतिशय जवळचे मित्र महेश अण्णा कोठे यांचे प्रयागराज येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची बातमी ऐकून खूप वाईट वाटले. ते गेले यावर विश्वास बसत नाही.
स्व. तात्यासाहेब कोठे यांच्यासोबत महेश अण्णा यांनीही अनेक वर्षे काँग्रेस पक्षात योगदान दिले होते. राजकारणात मला ही अनेक वेळा सहकार्य केले. अनेक वर्षे आम्ही राजकारणात, समाजकारणात, सुखदुःखात एकत्र होतो असा दिवस ऊजडेल असे वाटले नाही. एक चांगला मित्र आज आमच्यातून निघून गेला. कोठे कुटुंबीयांच्या कठीण प्रसंगी आम्ही त्यांच्यासोबत आहोत. महेश अण्णा कोठे यांना भावपूर्ण श्रद्धांजली.