बिजनेस
ब्रेकिंग! देशाचा अर्थसंकल्प सादर
- केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आज मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला आणि त्यांचा आठवा अर्थसंकल्प मांडला.
- या अर्थसंकल्पामधून काय महागले ? काय स्वस्त झाले? जाणून घ्या सविस्तर…
- काय स्वस्त?
- या अर्थसंकल्पामध्ये टीव्ही, मोबाईल, औषधे आणि इलेक्ट्रिक कार स्वस्त होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. तसेच एलईडी, एलसीडी टीव्ही, चामड्याच्या वस्तूही स्वस्त होणार आहेत. अर्थसंकल्पामध्ये तशी मोठी घोषणा करण्यात आली आहे. या बजेटमध्ये आरोग्य व्यवस्थेकडे विशेष भर देण्यात आला आहे. ज्यामध्ये 36 जीवनावश्यक औषधांना करामध्ये सूट देण्यात आली आहे. त्याचबरोबर कॅन्सरची औषधं स्वस्त होणार असून कॅन्सरच्या 36 औषधांवरची कस्टम ड्युटी हटवली आहे.
- काय महाग?
- या अर्थसंकल्पामध्ये अनेक वस्तूंच्या किंमती वाढवण्याचाही निर्णय घेतला आहे. प्रामुख्याने घराच्या किंमतीमध्ये वाढ होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. तसेच मोठे टीव्ही, बऱ्याच आवश्यक वस्तूंवर सीमाशुल्क कमी सूट दिली जाणार आहे. तंत्रज्ञान आणि उत्पादन क्षेत्रामध्ये महागाई होणार असल्याचे संकेत या बजेटमधून दिले आहेत.