महाराष्ट्र
ब्रेकिंग! महाराष्ट्राचे बजेट कधी सादर होणार?
- केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज संसदेत मोदी सरकारच्या तिसर्या कार्यकाळातील अर्थसंकल्प सादर केला. यावेळी निर्मला सीतारमण यांनी मध्यमवर्गींना गिफ्ट दिले.
- सीतारमण यांनी 12 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्याची घोषणा केली आहे. केद्रींय अर्थसंकल्पानंतर आता लवकरच महाराष्ट्राचा अर्थसंकल्प कधी जाहीर होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा पवार हे यंदाचा अर्थसंकल्प मांडणार आहेत.
- आता त्यांनी बारामतीमध्ये राज्याच्या अर्थसंकल्पाबद्दल भाष्य केले. यावेळी त्यांनी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प कधी जाहीर होणार, याबद्दलचीही घोषणा केली.
- मी केंद्राचे बजेट अजून ऐकलेले नाही. पण आपल्या राज्याचे बजेट मी मार्चच्या पहिल्या आठवड्यात किंवा दुसऱ्या आठवड्यात सादर करणार आहे. यावेळी माझा शेतकरी आणि सर्वसामान्य यांचा विचार करुनच अर्थसंकल्प मांडणार आहे. माझ्या लाडक्या बहिणींचाही मी विचार करणार आहे. तरुण तरुणींचाही विचार करुन हा अर्थसंकल्प सादर करण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे, असे अजितदादा म्हणाले.