बिग ब्रेकिंग! केजरीवालांना मोठा दणका

Admin
1 Min Read
  • दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजधानीतील वातावरण गरम झाले आहेत. यातच अरविंद केजरीवाल यांच्यासह आम आदमी पक्षाला निवडणुकीपूर्वी मोठा धक्का बसला आहे. एकाच दिवशी पक्षातील सात आमदारांनी पक्षाला ‘रामराम’ ठोकला आहे. पक्षाने सात आमदारांची तिकीटे कापली होती. त्यामुळे नाराज आमदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे.
  • त्रिलोकपुरी येथील आमदार रोहित कुमार, महरौलीचे आमदार नरेश यादव, कस्तूरबानगरचे आमदार मदन लाल, पालमच्या आमदार भावना गौड, जनकपुरीचे आमदार राजेश ऋषी, बिजवासनचे बीएस जून आणि आदर्शनगरचे पवन शर्मा यांनी पक्षाच्या सदस्यत्त्वाचा राजीनामा दिला आहे.
  • त्रिलोकपुरी येथील आमदार रोहित कुमार यांनी केजरीवाल यांना लिहिलेल्या पत्रात गंभीर केले आहेत. तुमच्या शब्दांवर विश्वास ठेवून माझ्या समाजाने तुम्हाला एकतर्फी पाठिंबा दिला होता. त्यामुळे दिल्लीत आपचे सरकार तीनदा सत्तेवर आले. मात्र, तुम्ही कंत्राटी पद्धत बंद करून 20-20 वर्षे काम करत असलेल्या लोकांना नोकरीवर कायम केले नाही. माझ्या समाजाचा वापर फक्त राजकीय महत्त्वकांक्षा पूर्ण करण्यासाठी करण्यात आला, अशी टीका रोहित कुमार यांनी केजरीवाल यांच्यावर केली.
Share This Article