तुळजापूर : तुळजापूर शहरातील नळदुर्ग रोडवर श्रीनाथ लॉन्च समोर वॅग्नर व क्रेटा या दोन गाड्यांची समोरासमोर धडक या धडकेत ४ जण जखमी झाले आहेत. आज वॅग्नर एम.एच. १२ एन. यु. ०२२८ या गाडीतील भाविक देवीचे दर्शन करून अक्कलकोट येथे मुक्कामी चालले होते.
समोरून एम. एच. २५ – बी. ए. ८८११ क्रेटा या गाडीशी समोरासमोर धडक झाल्याने वॅग्नर मधील अपर्णा चिंतामणी घाटे वय ४९ चंद्रभागा नारायण घाटे व ८३ चिंतामणी घाटे वय ५५ वैदेही चिंतामणी घाटे वय २० सर्व राहणारे वारजे पुणे येथील असून त्यांच्यावर तुळजापूर येथील जिल्हा उप रुग्णालय येथे उपचार चालू आहेत. यातील चिंतामणी घाटे हे गंभीर जखमी असून त्यांना पुढील उपचारासाठी धाराशिव जिल्हा रुग्णालय येथे हलविण्यात आले आहे.