देश - विदेश
ब्रेकिंग! काँग्रेसने केला राष्ट्रपतींचा अपमान

- संसदेच्या अर्थसंकल्पयीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी संयुक्त सत्रासमोर अभिभाषण केले. या अभिभाषणावर काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केलेल्या वक्तव्याचे जोरदार पडसाद उमटत आहेत.
- संसदेच्या परिसरात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर गांधी यांनी राष्ट्रपतींना Poor Lady (बिचारी महिला) असे म्हटले. सोनिया यांची ही प्रतिक्रिया अपमानास्पद आहे, अशी टीका भाजपने केली आहे. एक आदिवासी महिला देशाची राष्ट्रपती बनली हे काँग्रेसच्या संरजामशाही मानसिकतेला अजूनही पचलेले नाही, अशी टीका भाजपने केली आहे.
- संसदेच्या परिसरात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर प्रतिक्रिया देताना सोनिया म्हणाल्या की, राष्ट्रपती अभिभाषणाच्या शेवटी खूप थकल्या होत्या. बिचाऱ्या त्या मोठ्या प्रयत्नाने बोलत होत्या. सोनिया गांधी यांनी ही प्रतिक्रिया दिली, त्यावेळी काँग्रेस खासदार राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वाड्रा उपस्थित होते.
- भाजप नेते संबित पात्रा यांनी सोनिया यांच्या वक्तव्यावर जोरदार टीका केली आहे. आज संपूर्ण देशाने राष्ट्रपतींना लक्षपूर्वक ऐकले. काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी याबाबत केलेले वक्तव्य अतिशय दुःखद आणि चुकीचे आहे.
काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याबद्दल केलेले वक्तव्य चुकीचे आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. काँग्रेसने राष्ट्रपतींचा अपमान केला असल्याचे पंतप्रधानांनी सुनावले आहे.