महाराष्ट्र
ब्रेकिंग! दहावी-बारावी परीक्षांमध्ये कॉपी पकडल्यास विद्यार्थी सोडा आता शिक्षक आणि कर्मचाऱ्यांची सुद्धा खैर नाही

- राज्यातील दहावी आणि बारावी परीक्षांमध्ये कॉपीचा प्रकार आढळल्यास संबंधित परीक्षा केंद्राची मान्यता कायमस्वरूपी रद्द केली जावी तसेच शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना निलंबित करावे, असे स्पष्ट आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले आहेत. परीक्षेच्या पारदर्शकतेसाठी कडक उपाययोजना राबवण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
- राज्यातील दहावी आणि बारावीच्या परीक्षांचा सुरळीत आणि पारदर्शक पद्धतीने संचालन करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ बैठक झाली. यावेळी जिल्हाधिकारी, पोलीस अधिकारी आणि शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांशी त्यांनी संवाद साधला. राज्यभर 3,373 केंद्रांवर बारावीची परीक्षा 18 मार्चपर्यंत आणि 5,130 केंद्रांवर दहावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्चदरम्यान पार पडणार आहे.
- परीक्षेचे सुरक्षित आणि पारदर्शक आयोजन ही जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची सामूहिक जबाबदारी असेल. मोठ्या शहरांमध्ये पोलीस आयुक्त आणि महानगरपालिका आयुक्तांनाही जबाबदारी देण्यात आली आहे. इंग्रजी, गणित आणि विज्ञान विषयांच्या परीक्षांदरम्यान अधिकारी स्वतः परीक्षा केंद्रांना भेट देतील, अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिली.