राजकीय
पवार जादूटोणा करणारे भोंदूबाबा, त्यांनी ठाकरेंवर जादूटोणा केला
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे आजपासून सातारा जिल्हा दौऱ्यावर आहेत. त्यांनी यावेळी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये बोलताना बावनकुळेंनी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर जहरी टीका केली आहे.
- पवार जादूटोणा करणारे भोंदूबाबा आहेत. पवारांनी उद्धव ठाकरेंवर देखील जादूटोणा केलाा, अशी टीका बावनकुळे यांनी पवारांवर केली. जादूटोणा करणारा बाबा कोण हे पूर्ण देशाला अन् महाराष्ट्राला माहिती आहे. पवारांच्या संपर्कात कोणी आलं तर तो सूटत नाही, असंही बावनकुळेंनी म्हटलं.