खेळ
वर्ल्ड कप गेला, आता कर्णधारपदही जाणार
टीम इंडिया उपांत्य फेरीत इंग्लंडकडून 10 विकेट्सने पराभूत होऊन टी-20 विश्वचषक स्पर्धेतून बाहेर पडली आहे. या लाजिरवाण्या पराभवानंतर बीसीसीआय ॲक्शन मोडमध्ये येताना दिसून आली आहे. दरम्यान, भारतीय संघ ऑस्ट्रेलियातून न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे.
नुकताच मिळालेल्या माहितीनुसार बीसीसीआय पुढील काही महिन्यात रोहित शर्मा, विराट कोहली, आर. अश्विन आणि अनेक वरिष्ठ खेळांडूना बाहेरचा रस्ता दाखवू शकते. भारतीय संघाचे कर्णधारपद आता हार्दिक पंड्याकडे सोपवण्यात आले आहे.
टी-२० विश्वचषकाच्या सेमी फायनलमध्ये भारताला इंग्लंडकडून पराभव पत्करावा लागला. हा पराभव भारतीयांच्या जिव्हारी लागला आहे.विश्वचषकानंतर भारतीय संघ न्यूझीलंडच्या दौऱ्यावर जाणार आहे.
बीसीसीआयने यापूर्वीच न्यूझीलंडच्या दौऱ्यासाठी संघ निवडला होता आणि हा संघ निवडता त्यांनी रोहित, विराट आणि राहुल यांना विश्रांती देण्याचा निर्णय घेतला होता. हा विश्वचषक भारतीय संघ जिंकेल, असे वाटत होते. पण तसे घडले नाही. आता भारताच्या संघातील काही सामन्यांत विराट, रोहित आणि राहुल पाहायला मिळणार नाहीत.