हवामान
ब्रेकिंग! राज्यात उष्णतेची लाट, तापमान 45 पार जाणार

- राज्यात एप्रिल महिन्यातच मे सारखी स्थिती जाणवणार आहे. पुढचे चार दिवस हवामानात मोठे बदल होणार असून तापमान 42 ते 45 डिग्रीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला. मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि उपनगरात, कोकण पट्ट्यातही वातावरण कोरडे राहणार आहे. पावसाचा किंवा उष्णतेच्या लाटेचा कोणताही इशारा देण्यात आलेला नाही. हवामान विभागाने 18 ते २० एप्रिल दरम्यान सोलापूर, पुणे, कोल्हापूर, सातारा, अहिल्यानगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांमध्ये देखील यलो अलर्ट दिला आहे.
- 18 ते २० एप्रिल दरम्यान वरील जिल्ह्यात उष्ण तापमान राहील. त्यामुळे नागरिकांनी दुपारच्या वेळात घराबाहेर पडू नये, असा इशारा दिला आहे. घराबाहेर जाताना पाणी सोबत ठेवावे, शिवाय छत्री, टोपी घेऊन जावे, कोणतीही हयगय करू नये, असे म्हटले आहे. त्यानंतर हळूहळू वातावरण बदलण्याची शक्यता आहे. सध्या सोलापूर जिल्ह्यात कडक उन्हाळा जाणवत आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. रस्त्यावरील वाहतूक कमी झाली आहे. वाढत्या उन्हामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.