खेळ

यंदाच्या आयपीएलनंतर धोनीची निवृत्ती?

  • आयपीएलच्या मैदानात आज चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यामध्ये हायहोल्टेज लढत होणार आहे. या सामन्यात महेंद्रसिंग धोनी पुन्हा एकदा मैदानावर खेळताना दिसणार असून त्यामुळे चेन्नईच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. अशातच पुन्हा एकदा कॅप्टन कूल या आयपीएलनंतर निवृत्त होणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. त्यावर आता धोनीने त्याच्याच स्टाईलमध्ये महत्त्वाचा खुलासा केला आहे.
  • मी जोपर्यंत इच्छितो तोपर्यंत मी सीएसकेसाठी खेळू शकतो. ही माझी फ्रँचायझी आहे. जरी मी व्हीलचेअरवर असलो तरी ते मला ओढून खेळायला आणतील, अशी प्रतिक्रिया धोनीने दिली आहे.
  • दुसरीकडे चेन्नईचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने धोनीचे कौतुक केले आहे. यावेळीही धोनी संघासाठी अनेक महत्त्वाच्या खेळी खेळेल, अशी आशा गायकवाडने व्यक्त केली आहे. 

Related Articles

Back to top button