क्राईम
बस चालवत मोबाईलवर आयपीएलची मॅच पाहणे अंगलट

- एसटी चालवताना चालकांना मोबाईलवर बोलणे किंवा मोबाईल पाहण्यास बंदी असतानाही एका चालकाला ही चूक महागात चांगलीच महागाच पडली आहे. दादर ते स्वारगेट पुणे करीता निघालेल्या एका ई- शिवनेरीत चालक काल मोबाईलवर आयपीएलची मॅच पाहात बस चालवित असल्याची व्हिडीओ चित्रफित व्हायरल झाल्यानंतर एसटी महामंडळाने ही कारवाई केली आहे.
- दादर ते पुणे मार्गावर शिवनेरी बस चालवत असताना मोबाईलवर क्रिकेट मॅच पाहणाऱ्या एका खाजगी चालकाचा व्हिडीओ समाजमाध्यमावर व्हायरल झाला होता.
- त्यानंतर आता एसटी प्रशासनाने परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या आदेशानुसार संबंधित चालकाला सेवेतून बडतर्फ केले आहे आणि संबंधित खाजगी कंपनीला पाच हजार रुपये इतका दंड ठोठावला आहे.
- काल सायंकाळी ७ वाजता दादर येथून स्वारगेट (पुणे) साठी निघालेल्या खाजगी ई-शिवनेरी बसमधील चालक रात्री लोणावळा जवळ बस चालवत क्रिकेट मॅच पाहत असलेले चित्रीकरण संबंधित बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी परिवहन मंत्री सरनाईक यांना पाठवले. याबाबत सरनाईक यांनी तातडीने एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना नियमानुसार कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले.



