क्राईम
अवैध दारू विक्रेत्यांचा पाठलाग

- पाठलाग करणाऱ्या पोलिसांच्या दुचाकीवर अवैध दारु विक्रेत्याने लाथ मारुन हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार बुलढाण्यामध्ये घडला आहे. या घटनेत एका पोलीस कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला असून एक कर्मचारी जखमी झाला आहे.
- याबाबत सविस्तर माहिती अशी की, बुलढाणा जिल्ह्यात अवैध दारू विक्रेत्यांची हिंमत चांगलीच वाढली असून एका दारू विक्रेत्याने पाठलाग करणाऱ्या पोलिसांच्या बाईकला लाथ मारल्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची भयंकर घटना घडली आहे. चिखली तालुक्यातील शेळगाव आटोळ गावात ही घटना घडली. यामध्ये एक पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे. भागवत गिरी असे मृत्यू झालेल्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव असून राम आंधळे जखमी झाले आहेत.
- अंढेरा पोलीस स्टेशनचे राम आंधळे आणि भागवत गिरी दुचाकीने शेळगाव आटोळ परिसरात पेट्रोलिंग करत होते. शिवणकर नामक अवैध दारू विक्रेता दारूचे बॉक्स घेऊन शेळगाव आटोळकडे जात होता. ही माहिती मिळाल्यानंतर पोलिस कर्मचाऱ्यांनी पाठलाग करून शिवणकरला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र शेळगाव आटोळ जवळ शिवणकरने पोलिसांच्या बाईकला लाथ मारली.
- त्यामुळे बाईक रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला धडकली. यात बाईक चालवणारे गिरी यांचा जागीच मृत्यू झाला.



