महाराष्ट्र

ब्रेकिंग! कोरोना, वारकरी निधी ते विमान अपघात

  • आषाढी एकादशीचा पालखी सोहळा व्यवस्थित पार पडावा, यासाठी प्रशासन काळजी घेत आहे. आषाढी एकादशी यात्रा पालखी सोहळा हा लवकरच सुरू होत आहे. यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज महत्वाची माहिती दिली आहे. दरवर्षी पांडुरंगाच्या दर्शनाच्या निमित्ताने देहू आणि आळंदीवरून संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी जाते. ही पालखी पुणे, सातारा, सोलापूर या जिल्ह्यामधून जाते.
  • अहमदाबाद मधील सर्व वरिष्ठ यांनी आपला पाहणी केली आहे. या प्रकरणी पंतप्रधान गृहमंत्री यावर लक्ष ठेवून आहे. खरी वस्तुस्थिती लोकांच्या समोर ठेवावी माझी कळकळीची विनंती आहे. वारकऱ्यांना वीस हजार निधी एकनाथ शिंदे यांनी दिला होता. यावेळेस सगळ्यांची लिस्ट बनवली आहे. सर्वांना मान आणि निधी योग्य तो मिळेल, असे देखील अजितदादा यांनी स्पष्ट केले आहे.
  • कोरोना पार्श्वभूमीवर काही पेशंट पाहिला मिळाले राज्यात आहेत. पुण्यात पिंपरीत आहेत, रुग्ण सगळे कंट्रोलमध्ये आहे. आरोग्यमंत्री यावर लक्ष ठेवले आहेत. पुण्यात पिंपरी चिंचवडमध्ये काय करायला हवे, याबाबत अधिकाऱ्यांची बैठक घेतली. नागरिकांनी घाबरून जाऊ नये. मात्र, ज्यांचे वय जास्त आहे त्यांनी काळजी घ्यायची गरज आहे. तसेच गर्दी टाळायची गरज आहे. खोकला, शिंक आल्यास रुमाल वापरण्याची गरज आहे, याची काळजी घेतली पाहिजे, असे देखील अजितदादा यांनी सांगितले आहे.

Related Articles

Back to top button