सोलापूर

संजय राऊतांच्या अडचणीत पुन्हा वाढ

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. याप्रकरणी सुरू असलेल्या सुनवाणीत सातत्याने गैरहजर राहिल्याने कोर्टाने राऊत यांना आजीमनपात्र वॉरंट जारी केले आहे. याप्रकरणी शिवडी कोर्टात पुढची सुनावणी आता २४ जानेवारीला होणार आहे.

याप्रकरणी सोमय्या यांनी ट्विट करून माहिती दिली आहे. सातत्याने गैरहजर राहिल्याने कोर्टाने राऊत यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. मेधा सोमय्या यांचा जबाब नोंदवून घेतला आहे. पुढील सुनावणी २४ जानेवारीला होणार, असे ट्वीट सोमय्या यांनी केले आहे.
राऊत यांनी सोमय्या आणि मेधा सोमय्या यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. मीरा भाईंदर शहरात १५४ सार्वजनिक शौचालये बांधण्यात आले आहेत. त्यातील १६ शौचालये बांधण्याचे कंत्राट मेधा यांच्या युवक प्रतिष्ठानला मिळाले होते. बनावट कागदपत्रे सादर करून महापालिकेच्या अधिकाऱ्यांची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप सोमय्यांवर आहे. साडेतीन कोटींपेक्षा अधिक रुपयांची शौचालयाची बिलेही घेतल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.
शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत सर्वप्रथम हा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर तत्कालीन पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले. याप्रकरणी मेधा यांनी राऊत यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकला होता. याप्रकरणी त्यांना अनेकवेळा न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, तेव्हा दिल्लीत संसदेच्या पावसाळी अधिवेशनामुळे हजर राहता आले नाही. त्यानंतर ते ईडीच्या कोठडीत होते. त्यामुळे सुनावणीला हजर राहू शकले नाहीत. मात्र, आताही ते हजर राहिले नसल्याने त्यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट दाखल करण्यात आले आहे.

Related Articles

Back to top button