राजकीय
भटकती आत्मा हा उल्लेख कोणासाठी?

देशात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपली ताकद पणाला लावली आहे. विविध राजकीय पक्षांकडून प्रचार सभा व जाहीर सभा घेण्यात येत आहेत. देशात एकूण सात टप्प्यात मतदान होणार असून आतापर्यंत दोन टप्प्याचे मतदान पूर्ण झाले आहे. आता मतदानाचा तिसरा टप्पा सात मे रोजी आहे. दरम्यान
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आज जनतेला कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी त्यांनी शरद पवारांवर वक्तव्य केले आहे.
अजितदादा म्हणाले आहेत की, शरद पवार एक वरिष्ठ नेते आहेत. मी एक वेगळा रस्ता स्वीकारला आहे. मी एकेकाळी त्यांना दैवत मानत होतो. त्यांच्या स्टेटमेंटबद्दल मी काही बोलावे, एवढा मोठा मी नाही, असे वक्तव्य अजितदादा यांनी केले आहे.
पंतप्रधान मोदींच्या ‘भटकती आत्मा’ या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना अजितदादा म्हणाले की, पंतप्रधान मोदी कोणाला उद्देशून म्हटले ते मला माहिती नाही. मी त्या सभेमध्ये होतो. पुढच्या सभेत मला उपस्थित राहण्याची संधी मिळेल. तेव्हा मी मोदी साहेबांना नक्की विचारेन, भटकती आत्मा हा उल्लेख कोणाला डोळ्यासमोर ठेवून केला आहे?