देश - विदेश
महाकुंभात दिसलेली सुंदर तरुणी रातोरात झाली फेमस

- उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये महाकुंभला सुरुवात झाली आहे. जगभरातून साधू आणि भक्तांची रिघ प्रयागराजमध्ये लागली आहे. विविध प्रकारचे साधू कुंभमध्ये सामील होत आहेत. मात्र एका साध्वीची चर्चा सध्या देशभर सुरु आहे. हर्षा रिछारिया असे या साध्वीचे नाव आहे.
- हर्षाचा एक व्हिडीओ रातोरात ती इन्स्टाग्रावर व्हायरल झाला आणि रातोरात इन्स्टास्टार बनली. इन्स्टाग्राम ट्रॅकरच्या आकडेवारीनुसार हर्षाचे 12 जानेवारी रोजी इन्स्टाग्रामवर पाच लाख 31 हजार फॉओअर्स होते. त्यानंतर हर्षाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर 13 जानेवारीला तिचे एका दिवसात 3 लाख 28 हजार फॉलोअर्स वाढले. तर 14 जानेवारीला आतापर्यत तिचे एक लाख 84 हजार फॉलोअर्स वाढले आहेत. सध्या इन्स्टाग्रामवर तिचे दहा लाख 44 हजार फॉलोअर्स आहेत.