क्राईम
कॉलेजवरून घरी जाताना घात झाला

- राज्यात भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. भरधाव डंपरने बाईकला चिरडले. या अपघातामध्ये एका तरुणांचा जागीच मृत्यू झाला. बारामतीमधील तांदूळवाडीमध्ये हा अपघात झाला.
- मिळालेल्या माहितीनुसार, बारामतीच्या तांदूळवाडीमध्ये डंपरने बाईकला धडक दिली. डंपर चालकाने अचानक यु टर्न घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे बाईकवरून भरधाव वेगात येणाऱ्या तरुणांचा तोल गेला आणि ते बाईकसह खाली पडले. यावेळी डंपरच्या पुढच्या चाकाखाली आल्यामुळे एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला.
- दुचाकीसह तरुणाला चिरडल्यानंतर या बाईकवर बसलेल्या दुसऱ्या तरुणाने डंपर चालकाला अडवत जाब विचारण्याचा प्रयत्न केला. तेव्हा डंपर चालक खाली उतरला आणि त्याने जखमी मुलाला पाहिले आणि त्याने डंपर तिथेच सोडून घटनास्थळावरून पळ काढला. या तरुणाने पाठलाग करत डंपर चालकाला पकडण्याचा प्रयत्न केला. पण तो पळून गेला.