महाराष्ट्र
बिग ब्रेकिंग! गुइलेन बॅरे सिंड्रोमचा राज्यात पहिला बळी

- गुइलेन बॅरे सिंड्रोम या आजाराची लागण झालेल्या तरुणाचा सोलापुरात मृत्यू झाला आहे. मृत तरुण डीएसके विश्व धायरी भागामध्ये वास्तव्यास होता. एका खासगी कंपनीमध्ये तो सनदी लेखापाल (सीए) म्हणून कार्यरत होता.
- सदर तरुणाला 11 जानेवारी रोजी जुलाबाचा त्रास सुरू झाला होता. याच दरम्यान तो काही कामानिमित्त सोलापुरात आपल्या घरी गेला होता. तब्येत खालावल्याने त्याला सोलापुरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याला ‘गुइलेन बॅरे सिंड्रोम’ (जीबीएस) ची लागण झाल्याचे निदान झाले.
- उपचार सुरू असताना रुग्णाची तब्येत स्थिर होती, मात्र त्याला हालचाल करता येत नव्हती. गेल्या पाच दिवसांपासून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. प्रकृती स्थिर असल्याने त्याला अतिदक्षता विभागातून जनरल वॉर्डमध्ये हलवण्यात आले, पण काही वेळातच श्वास घेण्यास त्रास झाला आणि यातच त्याची प्राणज्योत मालवली.
- दरम्यान पुण्यात ‘गुलेन बॅरी सिंड्रोम’च्या रुग्णांची संख्या आता 73 झाली आहे. यामध्ये जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील सर्वाधिक 44 रुग्णांचा समावेश आहे. तर पुणे शहरात 11 आणि पिंपरी-चिंचवड शहरात 15 रुग्णांची नोंद झाली आहे.