सोलापूर
सोलापूर ब्रेकिंग! भीमशक्ती आदर्श पत्रकार पुरस्काराची घोषणा

- सोलापूर – बहुजनांच्या न्याय हक्कासाठी धर्मनिरपेक्षतेने लढणाऱ्या भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने पत्रकार दिनाचे औचित्य साधून शहर जिल्ह्यातील अकरा पत्रकारांना भीमशक्ती आदर्श पत्रकारिता पुरस्काराने गौरवण्यात येणार असल्याची माहिती राज्य सरचिटणीस सुबोध वाघमोडे, पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस राजा कदम, शहराध्यक्ष उमेश सुरते यांनी दिली.
- या पुरस्कार विजेत्यामध्ये दैनिक पुण्यनगरीचे उपसंपादक भरतकुमार मोरे, दै सकाळचे उपसंपादक अरविंद मोटे, दैनिक लोकमतचे उपसंपादक आप्पासाहेब पाटील, दैनिक संचारचे संतोष चितापुरे, दैनिक सुराज्य रोहन नंदाने, दैनिक तरुण भारतचे किरण बनसोडे, दैनिक दिव्य मराठीचे उमेश कदम, नवराष्ट्र न्यूज चैनलचे सोलापूर प्रतिनिधी विशाल भांगे, दैनिक पुढारीचे अमोघसिद्ध व्होनकोरे व लोकप्रधानांचे अकबर बागवान यांची निवड झाल्याची घोषणा केली.
- गौरवचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप असून येत्या ८ जानेवारी रोजी सायंकाळी ४ वाजता समाज कल्याण केंद्र रंगभवन येथे या पुरस्काराचे वितरण मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा महिला अध्यक्ष प्रमिला तुपलवंडे, मनोज लोंढे, मयूर तळभंडारे आदींनी केले आहे