राजकीय

मोठी बातमी! शरद पवार मोदींच्या भेटीला

  • राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली आहे. राज्यात मंत्रिपदावरून नाराजी नाट्य सुरू आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चाही दबक्या आवाजात सुरू आहेत. महाविकास आघाडीतही धुसफूस सुरू आहे. या घडामोडी घडत असतानाच आज शरद पवार यांनी दिल्लीला मोदी यांच्या भेटीसाठी रवाना झाले आहेत. या घटनेने राज्याच्या राजकारणात वेगळ्याच चर्चा सुरू झाल्या आहेत. दरम्यान, काल शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली होती. त्यानंतर आज शरद पवार मोदींची भेट घेणार असल्याचे समजते.
  • पवार हे मोदी यांची भेट घेण्यासाठी दिल्लीला गेले आहेत. साहित्य परिषदेचे निमंत्रण देण्याच्या उद्देशाने मोदींची भेट घेणार असल्याचे सांगितले जात आहे. परंतु, तरीही राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. यामागे कारणही आहे. महायुतीला बहुमत मिळालेले असतानाही राज्यात सध्या ज्या घडामोडी घडत आहेत, त्यावरुन संभ्रमाचे वातावरण तयार झाले आहे. त्यातच काल ठाकरे आणि फडणवीस यांची भेट झाली होती.
  • या भेटीआधी अजितदादा यांनीही शरद पवार यांची भेट घेतली होती. राजकीय कारण नाही, असे सांगितले जात असले तरी राजकीय चर्चा होणार नाही, असे म्हणणे धाडसाचेच ठरेल. त्यामुळे आता या मोदी आणि शरद पवार यांच्या संभाव्य भेटीकडेही त्याच दृष्टीने पाहिले जात आहे. राज्यात महायुतीला घवघवीत यश मिळाल्याने विरोधकांची ताकद कमी झाली आहे. त्यामुळे आता ज्या घडामोडी घडत आहेत, त्यातून काही नवी समीकरणे उदयास येतात का, अशीही चर्चा सुरू झाली आहे.

Related Articles

Back to top button