देश - विदेश

ब्रेकिंग! अमित शहा माफी मांगो… ‘जयभीम’च्या घोषणांनी संसद दणाणली

  • केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या विधानावरून आज संसदेच्या दोन्ही सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. आधी संसदेच्या बाहेर काँग्रेससह विरोधी पक्षाच्या खासदारांनी जोरदार निदर्शने केली. अमित शहा माफी मांगोच्या घोषणा दिल्या. त्यानंतर संसदेच्या दोन्ही सभागृहात विरोधकांनी अमित शहा माफी मांगो आणि जयभीमच्या घोषणा देत सभागृह दणाणून सोडले. यावेळी विरोधक चांगलेच आक्रमक झाले होते. विरोधकांचा गदरोळ काही थांबत नसल्याने अखेर संसदेच्या दोन्ही सभागृहाचे कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले.
  • गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात संसदेत एकेरी भाषेत आणि आंबेडकर या नावाला फॅशन असे संबोधून त्यांच्या नावाचा केला. वक्तव्याबद्दल अमित शहा यांनी माफी मागावी अशी मागणी करत काँग्रेस आणि इंडिया आघाडीच्या खासदारांनी संसद भवन परिसरात आंदोलन केले.
  • या आंदोलनात काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, विरोधी पक्षनेते राहुल गांधी, खासदार प्रियांका गांधी, खासदार प्रणिती शिंदे यांच्यासह काँग्रेस इंडिया आघाडीचे खासदार सहभागी झाले होते.

Related Articles

Back to top button