बिजनेस
खुशखबर! सोने अन् चांदीच्या दरातील घसरण कायम
सोने हा तर अमुल्य दागिना आणि हा धातू महाग धातूपैकी एक. या धातूपासून जे दागिने बनवले जातात त्याला मोठी पसंती महिला वर्गात आहे. सोने गुंतवणूक नेहमीच गुंतवणूक दारांसाठी फायदेशीर राहीले आहे आणि हा आर्थिक गंगाजळी प्राप्त करण्याचा लोकप्रिय पर्याय आहे. तुम्ही सोने किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्या क्षेत्रातील सध्याचे दर तपासा.
Goodreturns वेबसाईटनुसार, आज सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. 24 कॅरेट सोन्याच्या दरात सोळाशे रुपये प्रति शंभर ग्रॅम इतकी घसरण झाली आहे. यामुळे शंभर ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 7,80,000 रुपयांवरुन 7,78,400 रुपये इतका झाला आहे. दहा ग्रॅम 24 कॅरेट सोन्याच्या दरात 160 रुपयांची घसरण झाली आहे. यामुळे हा दर 78,000 रुपयांवरुन 77, 840 रुपये प्रति दहा ग्रॅम इतका झाला आहे