खेळ
रविंद्र जडेजा करणार टीम इंडियात कमबॅक!

रविंद्र जडेजा आशिया चषक 2022 मध्ये भारतीय संघासाठी खेळत होता. पण या स्पर्धेदरम्यान दुखापत झाल्यामुळे जडेजाने संघातून माघार घेतली. दुखापतीनंतर जडेजाची शस्त्रक्रिया झाली. या दुखापतीमुळे त्याला टी 20 विश्वचषकात देखील सहभागी होता आले नाही.
सध्या सुरू असलेल्या श्रीलंकेविरुद्धच्या मालिकांमध्ये तो खेळणार, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, आणखी थोडा काळ विश्रांती करण्याची मागणी त्याने बीसीसीआयकडे केल्याने त्याची निवड झाली नाही. भारताचा आघाडीचा फिरकीपटू असलेल्या अश्विनने नुकतीच एक मुलाखत दिली.
यामध्ये जडेजा कधी पुनरागमन करणार आहे, याबाबतचा संकेत त्याने दिला. अश्विन म्हणाला, माझे त्याच्यासोबत बोलणे झाले आहे. तो पूर्ण फिट असून, तुम्हाला लवकरच मैदानावर दिसेल. स्वतः मी त्याला मैदानावर पाहण्यासाठी इच्छुक आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी तो जोरदार तयारी करत असल्याचे त्याने सांगितले. फिटनेस आणि फलंदाजी कौशल्य यावरही त्याने मेहनत घेतली.