महाराष्ट्र
ब्रेकिंग! राज्य शासनाचा नवा धमाका

सोलापूर : महाराष्ट्र शासनाने भारतीय पोलीस सेवा आणि राज्य पोलीस सेवा अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले असून त्यामध्ये सोलापूरमध्ये कार्यरत असलेले पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांची पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली तर त्यांच्या जागी धाराशिव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अतुल विकास कुलकर्णी यांची सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली तर केगाव येथील पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्य वैशाली कडूकर यांची सातारा पोलीस दलाच्या अप्पर पोलीस अधीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बदल्या करण्यात आल्याचे सांगण्यात येते. दरम्यान राज्यातील 29 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्याचा आदेश काढण्यात आला आहे तो पुढील प्रमाणे :
- पंकज शिरसाट (पोलिस उपायुक्त,ठाणे शहर),अतुल झेंडे (पोलिस उपायुक्त,ठाणे शहर), रूपाली खैरमोडे (पोलि अधीक्षक,महामार्ग सुरक्षा पथक,ठाणे),विनायक नरळे (अपर पोलिस अधीक्षक,पालघर),अभिजीत शिवथरे (अपर पोलिस अधीक्षक,रायगड),राहुल माकणीकर (पोलिस उपायुक्त,९ नागपूर),लक्ष्मीकांत पाटील (पोलिस अधीक्षक,सायबर सुरक्षा,९ मुंबई), विजयकांत सागर (पोलिस उपायुक्त,बृहन्मुंबई),वैशाली कडूकर (अपर पोलिस अधीक्षक सातारा),दिपाली धाटे (पोलिस उपायुक्त,बृहन्मुंबई),सुरज गुरव (अपर पोलिस अधीक्षक,नांदेड)