ब्रेकिंग! वाल्मिक कराडला न्यायालयाचा मोठा झटका
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप असलेल्या वाल्मिक कराडला न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. बीड न्यायालयाने आज हा निर्णय दिला. खंडणी आणि मकोका अंतर्गत वाल्मिक कराडवर कारवाई करण्यात आली आहे.
देशमुख हत्याप्रकरण आणि खंडणी प्रकरणाचा प्राथमिक तपास पूर्ण झाल्याची माहिती सीआयडीने आज न्यायालयात दिली. कराडला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बीड न्यायालयात हजर करण्यात आले होते.
दरम्यान या प्रकरणातील सर्व आरोपींचे एकत्रित सीसीटीव्ही फुटेज काल समोर आले असून हा या प्रकरणातील सर्वात मोठा पुरावा मानला जात आहे. 29 नोव्हेंबर 2024 चे हे सीसीटीव्ही फुटेज असून ज्या दिवशी आवादा कंपनीकडे खंडणी मागितली होती, त्याच दिवशी सर्व आरोपी केज शहरातील विष्णू चाटेच्या कार्यालयात एकत्र आल्याचे व्हिडिओतून स्पष्ट होत आहे.