राजकीय
पंतप्रधान मोदींना पत्र लिहित शिंदेंनी घेतला मोठा निर्णय
- राज्यात सध्या पालकमंत्रीपदावरून महायुतीत मोठा वाद सुरू आहे. नाशिक आणि रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री पद न मिळाल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याची माहिती समोर आली आहे.
- यावरूनच राज्यात सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. यामध्येच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शिंदे यांनी पत्र पाठवत दिल्ली विधानसभा निवडणुकीबाबत मोठा निर्णय घेतला आहे.
- आगामी महिन्यात दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. या निवडणुकीत शिंदे यांनी आपला पाठिंबा भाजपला जाहीर केला आहे. त्यांनी याबाबत मोदी यांना एक पत्र देखील लिहिले आहे. यात त्यांनी असे म्हटले आहे की, हिंदुह्यदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारधारेवर आमचा शिवसेना पक्ष पुढे जात आहे. मोदी यांच्या नेतृत्वातील एनडीएचा घटक पक्ष आणि सदस्य असल्याचा अभिमान आहे. त्यामुळे शिवसेना पक्ष म्हणून आम्ही येत्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांना समर्थन देण्याचा निर्णय घेतला आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
- त्याचबरोबर मी शिवसेनेच्या राज्य पदाधिकारी यांना भाजपा प्रदेश कार्यालयासोबत संवाद साधून निवडणूक प्रचारात सक्रीय सहभाग घेण्याचे आदेश दिले आहेत. असेही शिंदे यांनी पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.