महाराष्ट्र

लाडक्या बहिणींसाठी खुशखबर !

बहीण योजनेसंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. जानेवारीचा हफ्ता महिलांच्या खात्यात कधी जमा होणार? यासंदर्भात महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी काही दिवसांपूर्वीच माहिती दिली आहे. 

दरम्यान, यावर आता स्वतः उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले की, लाडकी बहीण योजना कोणत्याही परिस्थिती चालूच राहणार आहे. याबाबत काळजी करू नका. फक्त त्याचा लाभ गरजू महिलेला मिळाला पाहिजे. जी व्यक्ती श्रीमंत आहे, टॅक्स भरते, नोकरी आहे, तिचा ऊस चांगला जातो, त्यांच्याबाबत वेगळा विचार करणार आहे.

पण ही योजना ज्या मायमाऊलीपर्यंत पोहोचायला हवी होती, त्यांच्यापर्यंत ही योजना पोहोचवण्याचे काम महिला आणि बालविकास विभागाने केले आहे. परवाच या योजनेसाठी 3700 कोटींचा चेक महिला आणि बालविकास खात्याला दिला आहे. 26 तारखेच्या आत लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये या योजनेचा सातवा हप्ता जमा होईल, असे अजितदादा यांनी म्हटले आहे.

Related Articles

Back to top button