महाराष्ट्र

अंगाची लाही लाही

सोलापूरसह अन्य भागात दिवसेंदिवस तापमानाचा पारा वाढतच आहे. यामुळे नागरिकांच्या अंगाची लाही लाही होत आहे. वाढत्या उन्हामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. राज्यात उष्णतेची लाट आली असून नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान खात्याने केले आहे. दरम्यान उत्तरेकडून वाहणाऱ्या वाऱ्यामुळे तापमानात वाढ होत आहे. सूर्य आग ओकत आहे.
पुढील दोन ते तीन दिवस सोलापूर परिसरातील पारा चढाच राहणार आहे. दरम्यान, तापमानात वाढ होत असून दुपारी १२ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत गरज असेल तरच घराबाहेर पडा, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
डोक्यावर आग ओकणारा सूर्य, तापलेले रस्ते यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. मागील दोन दिवसांपासून उष्णता वाढल्याने उन्हाचे चटके बसत आहेत. पुढील तीन दिवस उष्णतेचा कहर कायम राहणार आहे. १९ एप्रिलनंतर ही स्थिती हळूहळू कमी होईल, असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले.

Related Articles

Back to top button