राजकीय

शिंदे, अजितदादांना तगडा झटका ?

देशात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरणात चांगलेच तापू लागले आहे. राजकीय पक्षांकडून प्रचार केला जात आहे. विविध ठिकाणी जाहीर सभा होत आहेत. देशात एकूण सात टप्प्यात मतदान होणार आहे.

दरम्यान, एका वृत्तवाहिनीचा एक नवीन ओपिनियन पोल समोर आला आहे. या पोलमध्ये देशातील 543 जागांचा सर्व्हे करण्यात आला आहे. या पोलमध्ये राज्यातील 48 जागांसाठी सर्व्हे करण्यात आला आहे. या पोलमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का लागण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये अजितदादा गटाला शून्य जागा मिळण्याचा अंदाज आहे. यासोबतच या निवडणुकीत शिंदे  गटाला फक्त तीन जागा मिळणार असल्याचा अहवाल समोर आला आहे.
राज्यात लोकसभा निवडणुकीत एनडीएला 28 जागांवर विजय मिळणार आहे. एनडीएमध्ये सर्वात मोठा पक्ष भाजपा ठरणार आहे. भाजपाला या निवडणुकीत 25 जागा तर  शिंदे गटाला फक्त तीन जागा मिळणार आहेत. अजितदादा गटाला एकही जागेवर यश मिळणार नसल्याचा अंदाज या पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे.

Related Articles

Back to top button