राजकीय

ब्रेकिंग! राज्यात राजकीय भूकंपाला सुरुवात

  1. विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला कोकणात अपयश आले. यातच आता एकापाठोपाठ एक नेत्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडत पुढची राजकीय चाचपणी सुरू केली असल्याची चर्चा आहे. अलीकडे राजापूरचे माजी आमदार राजन साळवी हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. अशातच आता रत्नागिरीत ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे.
  2. ठाकरेंचे रत्नागिरी तालुकाप्रमुख बंड्या साळवी यांनी राजीनामा देत ठाकरेच्या शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ केला आहे. साळवी यांच्या रुपाने शिवसेनेसाठी कोकणातला हा मोठा धक्का मानला जात आहे. ते शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाटेवर असल्याच्या चर्चा जोर धरु लागल्या आहेत.
  3. बंड्या साळवी यांनी आपल्या तालुकाप्रमुख पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यामागचे कारणही स्पष्ट केले आहे. शिवसेनेतील फुटीनंतर रत्नागिरीतील शिवसैनिक विकासापासून वंचित राहिला असल्याचा ठपका ठाकरेंवर ठेवत आपण आपल्या तालुकाप्रमुख पदाचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
  4. विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीकडे महाविकास आघाडीतील ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांचा ओढा दुसऱ्या पक्षकडे वाढला आहे. त्यातच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. एकीकडे मोठ्या विजयानंतरही महायुती स्थानिकसाठी कामाला लागली आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडी अजून शांत आहे. अशातच शिंदेंनी ठाकरेंना धक्क्यावर धक्के देण्यास सुरुवात केली आहे.

Related Articles

Back to top button