राजकीय
मोठी बातमी! राज्यात पुन्हा सत्ताबदलाच्या हालचाली

राज्यात सध्या पक्ष बदलाचे वारे आहेत. त्यातच आज राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे पुण्यातील आजचे कार्यक्रम अचानक रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे अजितदादा भाजपमध्ये जाणार का? पवारांच्या मनात नेमके शिजतेय तरी काय?, या चर्चांना उधाण आले आहे.
एकीकडे अजितदादा यांचे कार्यक्रम अचानक रद्द झाले आहेत. तर दुसरीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे तडकाफडकी आज दिल्लीला गेले आहेत. बावनकुळेंचा अचानक दिल्ली दौरा आणि दुसरीकडे अजितदादा यांनी सासवडमधील सर्व कार्यक्रम स्थगित केल्याने चर्चेला उधाण आले आहे.