क्राईम
प्रेयसी निघाली उलट्या काळजाची; विष देऊन बॉयफ्रेंडला संपवले

- 23 वर्षीय प्रियकराची हत्या केल्याप्रकरणी केरळ न्यायालयाने प्रेयसीला फाशीची शिक्षा सुनावली आहे. तिरुअनंतपुरममधील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने 2022 मध्ये झालेल्या हत्याकांडात ही शिक्षा सुनावली आहे. शेरॉन राज हत्याकांडात आरोपी ग्रिष्माला ही शिक्षा सुनावण्यात आली आहे.
- तर हत्येनंतर पुरावे नष्ट करणाऱ्या ग्रीष्माच्या मामाला तीन वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. आई सिंधूची मात्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. ग्रीष्माने तिचा प्रियकर शेरॉन याला मारण्यासाठी हर्बल औषधात विषारी कीटकनाशक मिसळून विषबाधा केल्याचा निष्कर्ष कोर्टाने काढला.11 दिवस मृत्युशी झुंज दिल्यानंतर 25 ऑक्टोबर 2022 रोजी शेरॉनचा मृत्यू झाला होता.
- शेरॉनला मुख्य आरोपी ग्रिष्माने १४ ऑक्टोबर २०२२ रोजी तामिळनाडूच्या कन्याकुमारी जिल्ह्यातील रामवरमंचिराई येथील तिच्या घरी बोलावले होते. त्यावेळी आयुर्वेदिक टॉनिकमध्ये कीटकनाशक मिसळून त्याला प्यायला दिले. 11 दिवसांनंतर 25 ऑक्टोबर 2022 रोजी शेरॉन याचा रुग्णालयात मृत्यू झाला. याआधीही तिने शेरॉनला फळांच्या रसात पॅरासिटामॉलच्या गोळ्या मिसळून देण्याचा प्रयत्न केला होता.
- पण कडवट चवीमुळे शेरॉनने ते पिण्यास नकार दिल्याने ती त्याचा खून करण्यात अयशस्वी ठरली होती. नागरकोइल येथील लष्करी जवानासोबत ग्रीष्माचे लग्न ठरले. ही बाब समजल्यानंतर शेरॉनने त्यांचे नाते संपवण्यास नकार दिला होता. त्यानंतर ग्रीष्माने शेरॉनच्या हत्येचा कट रचत त्याला संपवले.