क्राईम
ब्रेकिंग! मित्रांसोबत ती महाबळेश्वरला फिरायली निघाली…

- सातारा महामार्गावरील नीरा नदी पुलाजवळ शिंदेवाडी येथे झालेल्या भीषण अपघातात 24 वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. रुबेल सिन्हा मृत तरुणीचे नाव आहे.
- तीन तरुण आणि एक तरुणी महाबळेश्वरला फिरण्यासाठी दुचाकीवरून निघाले होते. खंडाळा तालुक्यातील शिंदेवाडी गावाजवळील नीरा नदी पुलावर भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात रुबेल रस्त्यावर पडली आणि तिच्या अंगावरून ट्रक गेल्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला. दुचाकी चालवणारा तरुण गंभीर जखमी असून, त्याच्यावर शिरवळ येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.