महाराष्ट्र

ब्रेकिंग! तुम्ही धनंजय मुंडेंना पाठीशी घालताय का?

  • मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांड आणि पवनऊर्जा कंपनीला खंडणी मागितल्याप्रकरणी वाल्मिक कराड तुरुंगात आहे. यामागे मंत्री धनंजय मुंडे यांचा हात असल्याचा संशय विरोधकांकडून व्यक्त केला जात आहे. 
  • तसेच मुंडेंनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधकांकडून होत आहे. पण, मुंडेंच्या राजीनाम्याबाबत प्रश्न विचारताच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे आज चिडल्याचे पाहायला मिळाले. 
  • माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, माजी गृहमंत्री आर.आर. पाटील, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी त्या-त्या काळी ओढावलेल्या परिस्थितीनंतर मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. आताही मुंडेंच्या भोवताल संशयाचे वारे पसरले आहे. 
  • त्यामुळे मुंडेंनी नैतिकतेला धरून राजीनामा द्यावा, अशी मागणी सत्ताधारी पक्षातील आणि विरोधातील आमदारांनी केली आहे. याला धरूनच विचारल्यावर अजितदादांना संतापले. ते पुण्यात पत्रकारांशी संवाद साधत होते. 
  • मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत आहे, असा प्रश्न विचारल्यावर अजितदादा म्हणाले, त्यासंदर्भात कितीदा तेच-तेच सांगायचे. त्या प्रकरणातील चौकशीत जे कुणी दोषी असतील, त्यांच्यावर कारवाई होणार आहे. जेव्हा-जेव्हा मंत्र्यांवर राजीनामा झाले, ते चौकशीसाठी बाजू झाले. आता तुम्ही मुंडेंना पाठीशी घालता का? असा असे विचारल्यावर अजितदादांनी भडकत म्हटले, अरे बाळा चौकशीला सामोरे कधी जातात? तुझी चौकशी केव्हा होईल. तुझे नाव आले होईल ना. तुझे नाव नसेल, तर उगच चौकशी करतात का?.
  • यानंतर पत्रकार अजितदादांना वीज बिल माफीसंदर्भात प्रश्न विचारत होते. पण, चिडलेले अजितदादांना न थांबता निघून गेले.

Related Articles

Back to top button