राजकीय
निवडणूक काळात टीका टाळली पण विधानसभा जिंकताच अमित शहा फॉर्मात

- आज शिर्डीमध्ये भाजपकडून राज्यस्तरीय अधिवेशन आयोजित करण्यात आला होता. या अधिवेशनात बोलताना केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शहा यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली. तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांना कानमंत्र दिले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे आणि अनेकमंत्री उपस्थित होते.
- या अधिवेशनात शहा म्हणाले की, पवार यांनी 1978 पासून दगाफटक्याचे राजकारण केले होते. मात्र या विधानसभा निवडणुकीत तुम्ही त्या राजकारणाला 20 फुट जमिनीत गाडण्याचे काम केले.
- तर उद्धव यांच्यावर देखील शहा यांनी जोरदार हल्लाबोल केला. यावेळी शहा म्हणाले की, या विधानसभा निवडणुकीत तुम्ही उद्धव ठाकरेंना त्यांना त्यांची जागा दाखवण्याचे काम केले आहे. तसेच महाराष्ट्रात आतापर्यंत अस्थिरतेचे राजकारण सुरू होते. मात्र आता स्थिर सरकार आले आहे, असे शहा म्हणाले.



