सोलापूर

सोलापूर ब्रेकिंग! बचत गटाच्या हप्त्यावरून मोठा कांड

सोलापूर (प्रतिनिधी) बचत गटाच्या हप्त्यावरून मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर जणांविरुद्ध जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ३० ऑक्टोबर रोजी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास साखरपेठ येथे घडली. याप्रकरणी श्रीनिवास हरिदास उडता (वय-३३,रा.साखरपेठ) यांनी अलीकडे जेलरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून बसवराज पाटील व बसवराज यांचे दोन मित्र यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

या घटनेची हकीकत अशी की, फिर्यादी व फिर्यादी यांची पत्नी अंकिता असे जेवण करत असताना कीर्ती पाटील यांचे पती बसवराज पाटील याने फिर्यादीस फोन करून सात्विक मिठाई साखरपेठ या ठिकाणी बोलवून घेतले. 

त्यावेळी बचत गटाचा हप्ता दे असे म्हणून बसवराज पाटील याने शिवीगाळ करत पडलेल्या पीव्हीसी पाईपने फिर्यादी यांच्या पायाला व हाताला मारहाण केली. तसेच बसवराज यांच्या मित्रांनी फिर्यादी यांच्या तोंडावर डोक्यावर मारहाण करून तुला जीवे ठार मारतो अशी धमकी दिली.

दरम्यान फिर्यादी यांच्या खिशातून मोबाईल काढून घेऊन मोबाईल आदळून नुकसान केले. तसेच जेलरोड पोलीस स्टेशनच्या बाहेर भेटून केस मिटवून घे नाहीतर तुझ्यावर माझ्या बायकोला सांगून महिला बाबतची खोटी केस दाखल करीन व तुला अद्दल घडविन अशी धमकी दिली आहे, असे फिर्यादीत नमूद आहे. पुढील तपास पोसई.डेरे हे करीत आहेत.

Related Articles

Back to top button