महाराष्ट्र
ब्रेकिंग! त्या लाडक्या बहिणींकडून दंडासह रक्कम वसुली केली जाणार?

- लाडकी बहीण योजनेबाबत एक मोठी अपडेट समोर येत आहे. राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार छगन भुजबळ यांनी लाडक्या बहिणींची चिंता वाढवणारे वक्तव्य केले आहे.
- माध्यमांशी बोलताना भुजबळ यांनी ज्या महिलांचे अर्ज नियमित नाही, त्यांनी स्वत:हून आपली नावे काढून घ्यावी असे म्हटले आहे, तसेच अपात्र महिलांनी अर्ज मागे घेतले नाही तर त्यांच्याकडून दंडासह रक्कम वसुली करावी, असे वक्तव्य केले आहे. यामुळे आता पुन्हा एकदा या योजनेवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात आहेत.
- शिंदे सरकारने विधानसभा निवडणुकीआधी सर्वसामान्य महिलांना आर्थिक मदतीच्या उद्देशाने लाडकी बहीण योजना सुरू केली होती. विधानसभा निवडणुकीत महायुतीला या योजनेचा मोठा फायदा झाला. लाडक्या बहिणींनी महायुतीला भरभरून मते दिली आणि सत्तेत बसवले.
- परंतु आता याच योजनेबाबत सतत प्रश्न निर्माण केले जात आहेत. महायुती सत्तेवर विराजमान झाल्यानंतर आता या योजनेतील लाभार्थी महिलांची संख्या कमी करण्यासाठी सरकारकडून काही अटी घातल्या जात आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणी चिंतेत आहेत. असे असताना भुजबळ यांनी या योजनेबाबत मोठे वक्तव्य केले आहे.