राजकीय
ब्रेकिंग! संजय राऊतांची मोठी घोषणा

महाराष्ट्रातील लोकसभा, विधानसभा निवडणुका काही महिन्यांपूर्वी पार पडल्या. या निवडणुकीनंतर आता महापालिकेची निवडणूक कधी होणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
सध्या राज्यातील सर्वच पक्षांकडून महापालिकेच्या निवडणुकांची तयारी सुरु करण्यात आली आहे. त्यातच आता ठाकरे गटाकडून आगामी महापालिकांच्या पार्श्वभूमीवर मोठी घोषणा करण्यात आली आहे. मुंबईपासून नागपूरपर्यंतच्या महापालिका आम्ही स्वबळावर लढू, अशी घोषणा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
राऊत यांनी नागपुरात आज पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना महापालिकेच्या निवडणुकांबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी थेट पण स्वबळावर लढणार असल्याची घोषणा केली. त्यानुसार, मुंबईसह नागपूर महापालिका आम्ही स्वबळावर लढू, काय होईल ते होईल, एकदा आम्हाला पाहायचेच आहे, असे राऊत म्हणाले.