क्राईम

ब्रेकिंग! आता वाल्मिक कराडचा मुलगाही अडचणीत

  • मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण सध्या संपूर्ण राज्यात चर्चेत आहे. देशमुख यांच्या हत्येमागे वाल्मिक कराड यांचा हात असल्याचा संशय आहे. वाल्मिकला सध्या खंडणीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. 
  • वाल्मिकनंतर आता त्याचा मुलगा सुशील कराडही अडचणीत सापडला आहे. सुशीलवर सोलापूर जिल्हा सत्र न्यायालयात फिर्याद खाजगी फिर्याद दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. सुशीलवर रिव्हॉल्व्हरचा धाक धाकवून लुटमार केल्याचा आरोप आहे.
  • सुशीलवर त्याच्या मॅनेजरच्या घरात घुसून रिव्हॉल्वरचा धाक दाखवून दोन बल्कर ट्रक, दोन कार, परळीतील प्लॉट आणि सोने बेकायदेशीरपणे लुटल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी पीडित मॅनेजरच्या पत्नीने सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयात खाजगी फिर्याद दाखल करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे आता सुशीलचीही अडचण वाढण्याची शक्यता आहे. पीडित महिलेने दिलेल्या माहितीनुसार, सुशीलसह त्याचे मित्र अनिल मुंडे आणि गोपी गंजेवार यांनीही दमदाटी केली आहे, त्यांच्यावरही कारवाई व्हावी. ऑगस्ट महिन्यात याबाबत तक्रार दाखल करण्यात आलेली आहे, मात्र या अर्जावर अद्याप न्यायालयाने एफआयआर दाखल करण्याचा आदेश दिलेला नाही.
  • सुशीलविरोधात मॅनेजरच्या पत्नीने सोलापुरातील एमआयडीसी पोलीस स्टेशन, सोलापूर पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक बीड यांच्याकडे तक्रार दिली. मात्र या तक्रारीची दखल घेण्यात आलेली नाही. त्यानंतर पीडित महिलेने सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयात खासगी फिर्याद दाखल केली आहे. आता 13 जानेवारी रोजी याबाबत सुनावणी होणार आहे.

Related Articles

Back to top button