राजकीय
ब्रेकिंग! अजितदादा गटाकडून राजकीय भूकंपाची तयारी?

- महायुतीला विधानसभा निवडणुकीत जबरदस्त बहुमत मिळाले. तर महाविकास आघाडीचा धुव्वा उडाला. विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादीचे शरद पवार आणि अजितदादा पवार गट एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू असताना मोठी बातमी समोर आली आहे. अजितदादा गटाकडून शरद पवार गटाला खिंडार पाडण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांना वगळून सगळ्या खासदारांना अजितदादा गटाकडून ऑफर देण्यात आली आहे.
- विधानसभा निवडणुकीनंतर अजितदादा हे पवारांना तगडा झटका देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा होती. पवारांचे काही खासदार अजितदादा गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा होती. त्यामुळे पडद्यामागे घडामोडी घडत असल्याची चर्चा सुरू झाली. दुसरीकडे अजितदादा गटाच्या ज्येष्ठ नेत्याने सुप्रिया सुळे वगळता इतर सगळ्या खासदारांना संपर्क साधण्यात आला होता, असे एका वृत्तात म्हटले आहे.
- अजितदादा यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीकडून शरद पवारांच्या आठ पैकी सात खासदारांना आपल्याकडे येण्याची ऑफर देण्यात आली. डिसेंबर महिन्याच्या अखेरीस पडद्यामागे या सर्व घडामोडी घडल्या. अजितदादा गटाच्या ज्येष्ठ नेत्याने या सात खासदारांची स्वतंत्रपणे भेट घेतली आणि सत्तेसोबत राहण्याची ऑफर दिली. त्याशिवाय या भेटीबाबत आणि ऑफरबाबत ज्येष्ठ नेते शरद पवार आणि सुळे यांना कोणतीही कल्पना न देण्याचे सांगितले होते. मात्र, काही खासदारांनी अजितदादा गटाच्या ऑफरबाबत ज्येष्ठ नेते शरद पवार, सुळेंना कल्पना दिली असल्याचे समजते.