क्राईम
मोठी खळबळ, सात वर्षीय चिमुरडा बेपत्ता

- राज्यातील विविध भागात अलीकडे गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. दरम्यान, नाशिकच्या चांदवड तालुक्यातून खळबळजनक बातमी समोर येत आहे. वडनेर भैरव येथून एका सात वर्षीय बालकाचे अपहरण करून त्याची हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे.
वडनेर-भैरव येथे मोलमजुरी करणारे परप्रांतीय व्यक्ती संतोष भगत यांच्या सात वर्षीय मुलाचे तीन दिवसांपूर्वी अज्ञात तरुणाने अपहरण केले होते. आपला मुलगा बेपत्ता झाल्याची फिर्याद संतोष यांनी पोलीस ठाण्यात दाखल केली होती. दरम्यान पोलिसांनी तपास सुरु केला होता.
सात वर्षीय बालकाचे अपहरण झाल्याचा संशय व्यक्त केला जात होता. या प्रकरणी पोलिसांनी गावातील एका संशयिताला ताब्यात घेतले. संशयिताची कसून चौकशी केली असता त्याने मुलाची हत्या करुन मृतदेह मराठी शाळेजवळ मोकळ्या जागेत फेकल्याची माहिती पोलिसांनी दिली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बालकाचा मृतदेह ताब्यात घेतला. या हत्येचे कारण अद्यापही समजू शकले नाही.