राजकीय

शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला अजितदादांचा सुरुंग

राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे पानिपत झाले. यानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत.

महाविकास आघाडीत अस्वस्थता वाढू लागली आहे. कारण, आघाडीतील ठाकरे गट आणि शरद पवार गटाला गळती लागली आहे. यातच आता पवार गटाला दणका देणारी बातमी आली आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुका तोंडावर असतानाच येथील काही स्थानिक नेते पवारांची साथ सोडणार आहेत. माजी आमदार विलास लांडे या निवडणुकीत अजितदादा पवार गटासाठी काम करणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. तसेच त्यांचे नातलग अजित गव्हाणे आणि अन्य वीस माजी नगरसेवक लवकरच अजितदादा यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.

अजितदादा आणि गव्हाणे यांचा काही संवाद झाला आहे का, या प्रश्नावर लांडे म्हणाले, हो मला गव्हाणेंनी सांगितले की मला अजितदादांचा फोन आला होता. आले तर पुन्हा सर्वांना एकत्र घ्या. ज्यांनी आपल्यासाठी काम केले आहे, त्यांना परत ताकद द्या. त्यांना वाऱ्यावर सोडू नका, असे मी गव्हाणेंना सांगितले आहे. वीस नगरसेवकांसह अजितदादा गटात प्रवेश करण्याबाबत अजून माझी आणि गव्हाणे यांची काही चर्चा झालेली नाही. पण, माझ्याशी चर्चा करून त्यांनी अजितदादा गटात जावे, असे मला वाटते. या शहराची ओळख अजितदादांमुळे झाली आहे. त्यांनीच आम्हाला ताकद दिली हे आम्ही विसरू शकत नाही.

Related Articles

Back to top button